योजनेचा उद्देश
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या परंतु वसतीगृहातील विद्यार्थी क्षमतेअभावी शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करणे.
योजनेंतर्गत देण्यात येणारी रक्कम (वार्षिक)
| स्थान | भोजन भत्ता | निवास भत्ता | निवाह भत्ता | एकूण (१० महिने) | वैद्यकीय/अभियांत्रिकी | इतर शाखा |
|---|---|---|---|---|---|---|
| मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर | ₹32,000/- | ₹20,000/- | ₹8,000/- | ₹60,000/- | ₹5,000/- | ₹2,000/- |
| इतर महसूल विभागीय शहर व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्र | ₹28,000/- | ₹15,000/- | ₹8,000/- | ₹51,000/- | ₹5,000/- | ₹2,000/- |
| इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगर पालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात | ₹25,000/- | ₹12,000/- | ₹6,000/- | ₹43,000/- | ₹5,000/- | ₹2,000/- |
| तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण | ₹23,000/- | ₹10,000/- | ₹5,000/- | ₹38,000/- | ₹5,000/- | ₹2,000/- |
टीप: वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रू.५,०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रू.२,०००/- शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल.
मूलभूत पात्रता
- विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असावा.
- जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
- विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न ₹ २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतीगृह क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेला असावा.
- विद्यार्थ्याचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे बंधनकारक.
- विद्यार्थी ज्या शहरात शिकतो त्याच शहराचा रहिवासी नसावा.
- विद्यार्थ्याची वयोमर्यादा कमाल ३० वर्षे.
शैक्षणिक निकष
- इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
- मागील वर्षात किमान ५०% गुण असणे अनिवार्य.
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किमान ४०% गुण - ३% आरक्षण.
- महिलांसाठी ३०% समांतर आरक्षण.
- एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ७ वर्षे (व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ८ वर्षे) लाभ.
- अभ्यासक्रमाचा कालावधी किमान २ वर्षे असावा.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत दरवर्षी ३० नोव्हेंबर.
आवश्यक कागदपत्रे
- भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी)
- विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
- कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- भाड्याने राहत असल्याबाबतची भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा
- महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
- आधार कार्ड व बँक पासबुक
- उत्पन्न दाखला (₹ २.५० लाखांपेक्षा कमी)
- मागील वर्षाचे गुणपत्रक
अर्ज कसा करावा
- ऑनलाईन नोंदणी: hmas.mahait.org या पोर्टलवर जाऊन नोंदणी करा.
- कागदपत्रे अपलोड करा: सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज सादर करा: ऑनलाईन अर्ज पूर्ण भरून सबमिट करा.
- प्रिंट घ्या: अर्जाची प्रिंट घेऊन कार्यालयात सादर करा.
- मुदत: अर्ज करण्याची अंतिम मुदत दरवर्षी ३० नोव्हेंबर.
